कर्नाटक विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. काँग्रेसला सत्ता राखण्याचं, तर भाजपला काँग्रेसकडून सत्ता खेचून आणण्याचं आव्हान आहे. एकंदरीत दोन्ही पक्षांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
कर्नाटक निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार?
- भाजप – 89 ते 95
- काँग्रेस – 85 ते 91
- जेडीएस – 32-38
- इतर – 6 ते 12
मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती कुणाला?
- सिद्धरमय्या – 30 टक्के
- बी. एस. येडीयुरप्प – 25 टक्के
- एचडी कुमारस्वामी – 20 टक्के
कर्नाटकात भाजपचं सरकार कसं बनेल?
- एकूण जागा 224
- बहुमताचा आकडा – 113
- भाजप (92) + जेडीएस (35) – 127
कर्नाटकात काँग्रेसचं सरकार कसं बनेल?
- एकूण जागा 224
- बहुमताचा आकडा – 113
- काँग्रेस (88) + जेडीएस (35) - 123
कर्नाटकात कुणाची लोकप्रियता किती?
- नरेंद्र मोदी – 43 टक्के
- राहुल गांधी – 28 टक्के
कर्नाटकातील सर्वेक्षणाची काही ठळक वैशिष्ट्य :
- कर्नाटकात भाजप बहुमातापूसन 17 जागा दूर राहत असल्याचे या सर्वेक्षणावरुन दिसून येते आहे. बहुमातासाठी 113 जागांची आवश्यकता आहे.
- सर्वेक्षणानुसार काँग्रेसच्या हातून कर्नाटकची सत्ता जाऊ शकते, तर दुसरीकडे जेडीएसशिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही.
- लिंगायत समाज कर्नाटकात भाजपसोबत असल्याचे सर्वेक्षणावरुन दिसून येते. 60 टक्के लिंगायत समाज भाजपसोबत, तर 23 टक्के लिंगायत समाज काँग्रेससोबत असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.
- कर्नाटक निवडणुकीत भाजपला 35 टक्के, काँग्रेसला 37 टक्के, जेडीएसला 20 टक्के आणि इतर पक्षांना 8 टक्के मतं मिळण्याचा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे.