अरविंद पानगरिया RBI चे नवे गव्हर्नर?
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2016 02:00 AM (IST)
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदासाठी आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगरिया यांचं नाव चर्चेत आलं आहे. पानगरिया हे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या गुजरात मॉडेलचे समर्थक मानले जातात. मागच्या वर्षी योजना आयोगाच्या जागी बनवण्यात आलेल्या नीती आयोगाचे पानगरिया हे पहिले उपाध्यक्ष आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम पाहिलं आहे तसेच, एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक, आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन आणि संयुक्त राष्ट्रांच्या कामाचाही पानगरिया यांना अनुभव आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबरला संपणार आहे.