नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सचिव राजेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक सीबीआयने कुमार यांना बेड्या ठोकल्या आहेत.


 
2006 मध्ये झालेल्या 50 कोटींच्या घोटाळ्याचे राजेंद्र कुमार मुख्य सूत्रधार असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. राजेंद्र कुमार यांच्यासह इतर चार जणांनाही अटक झालीय. या सर्वांना उद्या पटियाला न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.

 
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याप्रकरणी सीबीआयने थेट दिल्लीच्या सचिवालयातील राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयवर टीका केली होती.