नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री सध्या डायटींगवर आहे. ते सध्या फक्त फळ आणि सलाद खात आहेत. शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी खाण्यापिण्यावर नियंत्रणं घातली आहेत.

पंजाब आणि गोवा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी खाण्याचा भरपूर आस्वाद घेतला. मात्र, यानंतर त्यांची शुगर लेवल खूप वाढली. यानंतर त्यांनी बंगलोरमध्ये इलाज सुरु केला. परिणामी, गेल्या २ महिन्यांपासून केजरीवाल फक्त फळ आणि सलाद खात आहेत. सध्या त्यांची शुगर नियंत्रणात आहे.

दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांकडून लंच आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी याबाबत खुलासा केला.

दुसरीकडे, आपचे नेते आणि आमदार सोमनाथ भारती यांना देखील शुगरचा त्रास असल्यानं मागील दोन वर्षापासून ते देखील फक्त फळं आणि सलाद घेतात.