नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर अनेक गंभीर आरोप केले. नोटबंदीमुळे दिल्लीत दहशतीचं वातावरण असून हा मोदी सरकारने गरिबांवर केलेला वार असल्याचं  केजरीवाल म्हणाले.


कॅशचा तुटवडा, ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट कसे वापराल?

केजरीवालांच्या आरोपादरम्यान भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी गोंधळ घातल्याने त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितलं. श्रीमंत लोक मोदींचे मित्र असून विजय मल्ल्यांना 8 हजार कोटी देऊन परदेशात पळवल्याचा आरोप केजरीवालांनी केला.

सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!

याशिवाय 2012 साली बिर्लाने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणजेच नरेंद्र मोदींना पैसे दिल्याचाही आरोप केजरीवालांनी केला आहे. दिल्ली विधानसभेत नोटबंदीच्या मुद्द्यावरुन जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.

तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता काळा पैसा, बनावट चलन रोखण्यासाठी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहेत. मात्र बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राजकारण जोरदार तापलं आहे.

बँकांबाहेर चार स्वतंत्र रांगा, तर मेडिकलमध्ये जुन्या नोटा चालणार

जुन्या नोटा सध्या पेट्रोल पंप, रुग्णालये, दूध केंद्र, सरकारी कार्यालये, विमानतळ, रेल्वे स्थानक अशा जीवनावश्यक ठिकाणीच चालत आहेत. या ठिकाणी 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा चालणार आहेत.