नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या तवांग इथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमधील शहीद जवानांच्या मृतदेहासोबत विटंबना झाल्याचं समोर आलं आहे.  शहीदांचे मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ते कार्डबोर्डमध्ये ठेवले होते.

मागील आठवड्यात शुक्रवारी तवांगमध्ये हवाईदलाचं हेलिकॉप्टर Mi-17 V5 कोसळलं होतं. या रेशन आणि आवश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये हवाईदलाचे पाच आणि भूदलाचे दोन जवान शहीद झाले होते.

परंतु सैन्याने निष्काळजीपणा दाखवत शहीदांचे मृतदेह तिरंग्याऐवजी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून कागदी बॉक्समध्ये ठेवण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली.

माजी कमांडर एच एस पनाग यांनी शहीदांच्या मृतदेहासोबत झालेल्या अमानवीय वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. क्रिकेटर गौतम गंभीरनेही ही घटना लाजिरवाणी असल्याचं ट्वीट केलं आहे.

https://twitter.com/GautamGambhir/status/917031987814305793

यानंतर हवाईदलालाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. हा प्रकार म्हणजे मोठी चूक असल्याचं सांगत हवाईदलाने शहीदांचे पार्थिव सन्मानाने कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.