नवी दिल्ली : काँग्रेसचा उद्देश घराणेशाहीची सेवा करणे आहे, मात्र आमचा उद्देश देशाची सेवा करण्याचा आहे, असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला. शिवाय, आमच्या आणि काँग्रेसच्या नैतिकतेत खूप अंतर असल्याचेही ते म्हणाले.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीचे झालेले फायदे सांगितले. "नोटाबंदीचा निर्णय म्हणजे अभूतपूर्व घटना आहे. अर्थव्यवस्थेला बदलणं अनिवार्य होतं.", असे जेटली म्हणाले.
"नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार बंद होईल, असे नाही. मात्र भ्रष्टाचार करणं अवघड होऊन बसेल. शिवाय टेरर फंडिंगही रोखली गेली आहे.", असा दावा जेटलींनी यावेळी केला. शिवाय, "कॅशलेस अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आमच्या सरकारने मोठी संधी निर्माण केली आणि नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली.", असेही जेटली म्हणाले.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी 9 राज्यांच्या राजधानीतून भाजप पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदीचे फायदे आणि काळ्या पैशावर चर्चा करणार आहे.
काँग्रेसचा उद्देश घराणेशाहीची सेवा, आमचा उद्देश देशसेवा : जेटली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2017 05:28 PM (IST)
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी 9 राज्यांच्या राजधानीतून भाजप पत्रकार परिषद घेऊन, नोटाबंदीचे फायदे आणि काळ्या पैशावर चर्चा करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -