नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील सामन्यात विजय मिळवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. 'टीम इंडियाचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक' असं ट्विट अमित शाहांनी केलं आहे.

मॅन्चेस्टर येथे झालेल्या सामन्यात विश्वचषकात पाकिस्तानवर विजय मिळवण्याची परंपरा भारताने कायम ठेवत 89 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानचा विश्वचषकात सातव्यांदा पराभव केला आहे. या विजयानंतर अमित शाहांनी ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं. "टीम इंडियाचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक आणि निकालही तोच. या उत्कृष्ट खेळाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन. या विजयाबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे आणि सर्व हा आनंद साजरा करत आहेत", असं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे.


भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर हतबल दिसले. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला आहे. पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकांत 302 धावांच आव्हान देण्यात आला होतं. म्हणजे अवघ्या 5 षटकांत पाकिस्तानला 136 धावांच अशक्य आव्हान मिळालं होतं.

पाकिस्तानकडून फकर जमानने 62, बाबर आझमने 48 इमाथ वसिम 46 धावा केल्या. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

संबंधित बातम्या :

रोहित शर्मा बनला 'सिक्सर किंग', 'या' विक्रमाला गवसणी

भारताला आणखी एक झटका, भुवनेश्वर 2 ते 3 सामन्यांमधून बाहेर