बिहारमध्ये महाआघाडीची घोषणा, ‘रालोसपा’चे उपेंद्र कुशवाह यूपीएमध्ये सहभागी
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2018 06:51 PM (IST)
माजी केंद्रिय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी देखील महाआघाडीची वाट धरली आहे. काही दिवसांपूर्वी कुशवाहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज बिहारमधील महाआघाडीची घोषणा करण्यात आली. माजी केंद्रिय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी देखील महाआघाडीची वाट धरली आहे. काही दिवसांपूर्वी कुशवाहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बिहारमध्ये जागा वाटपावरुन कुशवाह नाराज होते. दिल्लीत काँग्रेस कार्यालयात महाआघाडीची ही घोषणा झाली. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासह बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि वरिष्ठ समाजवादी नेते शरद यादव देखील उपस्थित होते.