Port Blair Renamed Sri Vijaya Puram : केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे सरकारने शुक्रवारी श्री विजयपुरम असे नामकरण केले. गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांपासून देशाला मुक्त करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजयपुरम' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी, 23 जानेवारी 2023 रोजी नेताजींच्या 126 व्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींनी अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर नाव देण्याचा निर्णय घेतला होता. 28 डिसेंबर 2018 रोजी अंदमान आणि निकोबारच्या हॅवलॉक बेट, नील बेट आणि रॉस बेटाची नावे बदलण्यात आली. हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज द्विप, नील बेटाचे नाव शहीद द्विप आणि रॉस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र द्विप ठेवण्यात आले.
शाह यांनी सोशल मीडियावर लिहिले की, देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजयपुरम' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाचे अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. हे बेट ते ठिकाण आहे जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस जी यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता आणि वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.
देशात सर्वप्रथम नेताजींनी येथे तिरंगा फडकावला
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला ते हे ठिकाण आहे. वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी शिक्षा म्हणून येथील सेल्युलर जेलमध्ये अनेक वर्षे याठिकाणी काढली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढत होते.
इतर महत्वाच्या बातम्या