Andaman And Nicobar Islands: अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील 21 निर्मनुष्य बेटांना ‘परमवीर चक्र’प्राप्त शूर सैनिकांची नावे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 21 बेटांपैकी 16 उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यात आहेत, तर पाच बेटे दक्षिण अंदमानमध्ये आहेत. या सर्व बेटांना ‘परमवीर चक्र’ (Param Vir Chakra) प्राप्त शूर सैनिकांची नावे देण्यात आली आहेत. अंदमान-निकोबार या केंद्र शासित प्रदेशाचे खासदार कुलदीप राय शर्मा यांनी केंद्र सरकारच्या या निर्णायचं स्वागत केले आहे. 


केंद्र सरकारने संरक्षण आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांची नावे शूर सैनिकांवरुन ठेवली आहेत. याबाबत बोलताना खासदार कुलदीप राय शर्मा म्हणाले की, “ आपल्या शूर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने अंदमान निकोबारच्या 21 बेटांची निवड केल्यामुळे आनंद झालाय. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शूर सैनिकांच्या पराक्रमाचं पुस्तकही प्रकाशित करण्यात यावे. अशी माझी केंद्र सरकारला विनंती आहे. जेणेकरुन चिमुकल्यांना आपल्या मातृभूमीसाठी सैनिकांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मदत होईल.” 


21 बेटांना कोणत्या शूर सैनिकांची नावे?
उत्तर आणि मध्य अंदमानमधील ‘आयएनएएन 370’ क्रमांकाच्या पहिल्या निर्जन बेटाला मेजर सोमनाथ शर्मा यांचं (Major Somnath Sharma) नाव देण्यात आले. यापुढे‘आयएनएएन 370’ ‘सोमनाथ दीप’ म्हणून ओळखले जाईल. सोमनाथ शर्मा यांना पहिला परमवीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.  3 नोव्हेंबर 1947 रोजी श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानी घुसखोरांसोबत दोन हात करताना सोमनाथ शर्मा यांना वीरमरण आले होते. 1947 च्या भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत जिवाची बाजी लावणारे मानद कॅप्टन करम सिंह यांचे नावही ‘आयएनएएन 370’ च्या एका बेटाला देण्यात आलेय. कॅप्टन करम सिंह यांना जम्मू काश्मिरच्या दक्षिणेकडील रिचमार गली येथे फॉरवर्ड पोस्ट वाचवल्याबद्दल परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय मेजर रामा राघोबा राणे, नाईक जदुनाथसिंग, कंपनी हवालदार मेजर पिरूसिंग शेखावत, कॅप्टन गुरबचनसिंग सलारिया, लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा मगर, सुभेदार जोगिंदरसिंग साहनन, मेजर शैतानसिंग भाटी, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अरविंद सिंह, लेफ्टनंट कर्नल धनसिंह थापा मगर. तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, कर्नल होशियार सिंह दहिया, सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखोन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, कॅप्टन बाना सिंह, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे आणि सुभेदार मेजर संजय कुमार - सर्वांचे पूजन झाले. परमवीर चक्र- बेटांना त्यांच्या नावावरून सन्मानित करण्यात आले आहे.