नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात कोसळलेलं हवाई दलाचं एएन-32 या विमानातील 13 पैकी सहा जवानांचे मृतदेह सापडले असून सात जणांचे अवशेष मिळाले आहेत. आता मृतदेह आणि अवशेष आसाममधील जोरहाटमध्ये आणण्याचे प्रयत्न आहेत. आज हवामान योग्य असेल तर मृतदेह आणि अवशेष जोरहाटला आणले जातील.
एएन 32 हे विमान 3 जूनपासून बेपत्ता होतं. आसाममधील जोरहाटहून अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात असलेल्या मेनचुका इथे जाण्यासाठी या विमानाने 3 जून रोजी दुपारी 12.25 वाजता 13 जणांसह उड्डाण केलं होतं. मात्र पुढच्या 35 मिनिटांतच विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर भारतीय सैन्यदलाकडून युद्धपातळीवर विमानाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते.
अखेर भारतीय सैन्याच्या Mi 17 हेलिकॉप्टरला 11 जून रोजी बेपत्ता एएन 32 (AN-32) विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील लिपो भागात दिसले होते. हे अवशेष लिपोपासून उत्तरेला 16 किलोमीटरवर, तर अरुणाचल प्रदेशातील टोटोपासून ईशान्येकडे 12 हजार फूट उंचावर आढळले होते.
दुसऱ्या दिवशी 19 जणांची टीम हेलिकॉप्टरद्वारे इथे दाखल झाली होती. परंतु डोंगर, घनदाट जंग आणि खराब हवामान यामुळे जवानांचे मृतदेह शोधण्यास अडचणी येत होत्या आणि अनेक वेळा मोहीम थांबवावी लागली होती.
शोध मोहीमेत गरुड कमांडो, नागरिक पोर्टर्स, शिकारी तसच भारतीय सैन्याच्या विशेष पथकाचा समावेश होता. खराब हवामानामुळे मगील तीन दिवसात एमआय 17, चिता आणि एएलएचसह कोणत्याही हेलिकॉप्टरला घटनास्थळी उतरता आलं नव्हतं.
मृतांची नावं
1. विंग कमांडर चार्ल्स
2. स्क्वॉड्रन लीडर एच विनोद,
3. फ्लाईट लेफ्टनंट आर थापा
4. फ्लाईट लेफ्टनंट ए तन्वर
5. फ्लाईट लेफ्टनंट एस मोहंती
6. फ्लाईट लेफ्टनंट एमके गर्ग
7. वॉरंट ऑफिसर केके मिश्रा
8. सार्जंट अनुप कुमार
9. कॉर्पोरल शेरीन
10. लीडिंग एअरक्राफ्टमन एस के सिंह
11. लीडिंग एअरक्राफ्टमन पंकज
12. एनसी (ई) पुतली
13. एनसी(ई) राजेश कुमार
संबंधित बातम्या
AN 32 Crash | हवाई दलाच्या अपघातग्रस्त एएन 32 विमानातील सर्व 13 जणांचा मृत्यू
वायूसेनेचं एएन 32 विमान बेपत्ता, विमानात 5 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स
AN-32 | वायुदलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशात आढळले
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AN 32 Crash | अरुणाचल प्रदेशात सहा मृतदेह आणि सात जणांचे अवशेष सापडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2019 01:22 PM (IST)
शोध मोहीमेत गरुड कमांडो, नागरिक पोर्टर्स, शिकारी तसच भारतीय सैन्याच्या विशेष पथकाचा समावेश होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -