मुंबई : 'द टेस्ट ऑफ इंडिया' अशी टॅगलाईन असणाऱ्या 'अमूल'ची चमचमीत, चटपटीत चव तुम्हाला चाखायला मिळणार आहे. 'अमूल'चे समोसे, पराठे, पॅटिस लवकरच बाजारात दाखल होणार आहेत.


आता दूध, बटर, चीज, श्रीखंड अशा दुग्धजन्य पदार्थांसोबत फ्रोझन स्नॅक्सही उपलब्ध होणार आहेत. पनीर पराठा, पॅटिस, समोसा असे सात ते आठ प्रकारचे पदार्थ पुढच्या दोन दिवसात बाजारात पाहायला मिळणार आहेत. खवय्यांचा प्रतिसाद पाहून पदार्थांची संख्या आणखी वाढवली जाणार आहे. अमूल कंपनीच्या विस्तारासाठी पुढच्या दोन वर्षांत दोन हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

लेह-लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत आणि जैसलमेरपासून शिलाँगपर्यंत अमूलचे 66 डेपो आणि दोन लाख आऊटलेट्स आहेत. कोट्यवधींना आमची उत्पादनं पसंत पडल्यामुळे फ्रोझन स्नॅक्स बाजारात आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

अमूल कंपनीच्या विस्तारासाठी येत्या दोन वर्षांत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. कोलकाता, वाशी आणि वाराणसीमध्ये यासाठी भव्य प्रकल्पाची उभारणी होणार आहे.