मुंबई : प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खां यांना ब्रिटन दूतावासाकडून व्हिसा नाकारण्यात आला आहे. 70 वर्षीय अमजद अली खां यांना पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये रॉयल फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रम सादर करायचा होता. पण व्हिसा नाकारल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
https://twitter.com/AAKSarod/status/764068414876975104
व्हिसा नाकारल्याचं कारण दूतावासाला विचारण्यात आलं. त्यावर वैयक्तिक गोष्टींवर दूतावास कोणतीही टिप्पणी करत नाही, असं स्पष्टीकरण दूतावासाच्या प्रवक्त्याने दिलं आहे.
https://twitter.com/AAKSarod/status/764090605102206976
या प्रकारानंतर अमजद अली खां यानी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सुषमा स्वराज यांनाही मेंशन केलं आहे. "माझा यूकेचा व्हिसा नाकारला आहे. प्रेम आणि शांती पसरवणाऱ्या कलाकारांसाठी ही अतिशय दु:खद बाब आहे," असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. तसंच 70च्या दशकापासून ब्रिटनमध्ये या महोत्सवासाठी जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.