नवी दिल्ली: भाजप अध्यक्ष अमित शाह हे देशाचे नवे संरक्षणमंत्री होण्याची शक्यता आहे. अमित शाह हे गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणूक लढवण्याचं कारण हेच असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मोंदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हं आहेत. या मंत्रिमंडळात अमित शाह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्याचे संकेत आहेत.
याशिवाय नुकतंच बिहारमध्ये एनडीएच्या साथीला आलेले नितीश कुमार, यांच्या जेडीयूलाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सध्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडेच संरक्षण मंत्रीपदाचा भार आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने त्यांना संरक्षण मंत्रीपद सोडावं लागलं.
पर्रिकरांना संरक्षण मंत्री करण्यासाठी गोव्याचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. मात्र विधानसभेच्या निकालाने गोव्याच्या राजकारणाचं चित्र बदललं. त्यामुळे पर्रिकरांना पुन्हा संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात परतावं लागलं.
पर्रिकर संरक्षण मंत्री होण्यापूर्वी अरुण जेटली यांच्याकडेच संरक्षण मंत्रीपद होतं. त्यानंतर आता जेटलीच ते पद सांभाळत आहेत.
अमित शाह संरक्षण मंत्री होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2017 10:08 AM (IST)
संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मोंदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हं आहेत. या मंत्रिमंडळात अमित शाह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्याचे संकेत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -