चेन्नई/नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचा तीन दिवसीय तामिळनाडू दौरा रद्द केला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. 22 ऑगस्टपासून अमित शाह यांचा तामिळनाडू दौरा होता.
येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असल्यामुळे अमित शाह यांनी तामिळनाडू दौरा रद्द केला, अशी माहिती भाजपच्या एक वरिष्ठ नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
अमित शाहांना दिल्लीत एनडीएच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होती, त्यामुळे त्यांना दौरा टाळला, असं तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष तमिलिसाई सौंदरराजन यांनी स्पष्ट केलं आहे.
दिल्लीत होणाऱ्या काही बैठकांमध्ये अमित शाह यांची उपस्थिती महत्त्वाची होती, त्यामुळे दौरा रद्द करण्यात आला, असं तमिलिसाई सौंदरराजन यांनी परिपत्रकाद्वारे म्हटलं आहे. त्यांच्या पुढील दौऱ्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या देशव्यापी दौऱ्यावर आहेत. तामिळनाडूमधील दौराही त्याचाच एक भाग होता. तामिळनाडूमध्ये भाजपचा केवळ एकमेव खासदार आहे, तर 234 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपचा एकही आमदार नाही.
अमित शाहांचा तामिळनाडू दौरा रद्द, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2017 08:05 PM (IST)
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होतील, असा अंदाज लावला जात आहे. कारण अमित शाह यांनी त्यांचा तामिळनाडू दौरा रद्द केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -