चेन्नई : तामिळनाडूतील अण्णा द्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. काल रविवारी अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर सहमती झाली होती, आज त्याची औपचारिक घोषणाही करण्यात आली आहे.

विलिनीकरणानंतर पलानीस्वामी मुख्यमंत्री या नात्याने राज्यातील सरकारची धुरा सांभाळतील, तर पन्नीरसेल्वम पक्षाचे निमंत्रक म्हणून काम पाहतील. तसंच ई पलानीसामी सहनिमंत्रक म्हणूनही काम पाहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान शशिकला आणि कुटुंबियांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून ओ. पन्नीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.