मुंबई : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉन वेबसाईटवर कारवाईचे संकेत दिले आहेत. अमेझॉनच्या कॅनडातील वेबसाईटवर तिरंग्यासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत. त्याविरोधात स्वराज यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. तसंच कॅनडातील भारतीय दुतावासाला अॅमेझॉनवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/819177814037512193
नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या सुषमा स्वराज यांना ट्विट करुन तिरंग्यासारख्या पायपुसण्याची माहिती एका व्यक्तीनं दिली होती. त्याची लगेच दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
अॅमेझॉननं तिंरंग्यासारख्या पायपुसण्याची विक्री लगेच थांबवावी. तसंच भारताच्या तिरंग्याच्या अवमानाप्रकरणी माफी मागावी असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/819192573134680064
तसंच अमेझॉनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला व्हिजा देणार नसल्याचं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या ज्या अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिजा आहे. त्यांचा व्हिजा रद्द करणार असल्याचं स्वराज यांनी सांगितलं आहे.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/819192941130326016
अमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या तिरंग्यासारख्या पायपुसणीसोबतच इंग्लंडच्या झेंड्याच्या रंगाचीही पायपुसणी विक्रीस ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन या वेबसाईटच्या पेजचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले जात आहेत.
सोशल मीडियावर याप्रकरणी तिरंग्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत.