- रिलायन्स जिओ - 18.16 Mbps
- व्होडाफोन - 6.7 Mbps
- आयडिया - 5.03 Mbps
- एअरटेल - 4.68 Mbps
- एअरसेल – 3 Mbps
- रिलायन्स कम्युनिकेशन्स - 2.6 Mbps
रिलायन्स जिओ इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्येही नंबर वन!
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2017 08:32 PM (IST)
मुंबई : रिलायन्स जिओने इंटरनेट जगतात धुमधडाक्यात आगमन केलं होतं. फ्री इंटरनेट डेटा देत इतर टेलिकॉम कंपन्यांना धडकी भरवल्यानंतर आता डाऊनलोड स्पीडमध्येही रिलायन्स जिओने पहिला क्रमांक पटकावला आहे. भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांच्या डाऊनलोड स्पीडला मागे टाकत रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. ‘ट्राय’च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात जिओ नेटवर्कचा डाऊनलोड स्पीड प्रति सेकंद 18.16 Mbps होता. रिलायन्स जिओने सप्टेंबर 2016 मध्ये आपल्या 4G सेवेची औपचारिक सुरुवात केली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात नेटवर्कचा सरासरी स्पीड 7.26 Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये स्पीड कमी होऊन 5.85 Mbps झाला होता. ट्राय दर महिन्याला इंटरनेट स्पीडची आकडेवारी जाहीर करते. जिओसोबत व्होडाफोनचा इंटरनेट स्पीडही वाढला आहे. नोव्हेंबरमध्ये व्होडाफोनचा इंटरनेट स्पीड 4.9 Mbps होता, तर त्यात वाढ होऊन डिसेंबरमध्ये 6.7Mbps एवढा झाला आहे. डिसेंबरमध्ये कोणत्या नेटवर्कचा किती डाऊनलोड स्पीड :