चंदीगड/ पणजी: पंजाब आणि गोव्यामधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आजुपासून नामांकन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पंजाब आणि गोव्यामध्ये 4 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून, यासाठी आज पहिली अधिसूचना जाहीर झाली.
पंजाबमध्ये विद्यमान विधानसभेचा कार्यकाल 19 मार्च 2012 रोजी सुरु असून, विधानसभेची मुदत 18 मार्च 2017 रोजी समाप्त होत आहे. येथे एकूण 117 जागांसाठी मतदान होणार आहे.
तर गोव्यामध्ये एकूण 40 जागांसाठी 4 फेब्रुवारी रोजी पाहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. गोवा विधानसभेचा कार्यकाल 19 मार्च 2012 रोजी सुरु झाला असून, 18 मार्च 2017 रोजी विधानसभेची मुदत समाप्त होत आहे.
दोन्ही राज्यातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2017 आहे. पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल 11 मार्च रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, आज नामंकन अर्ज स्विकारण्याच्या पहिल्या दिवशी कोणत्याही मोठ्या नेत्याने नामांकन अर्ज दाखल केला नाही.