मुंबई : काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा हे नव्या वादात सापडले आहेत. आजतक या वृत्तवाहिनीवरील एका डिबेट शोमध्ये चर्चा करताना त्यांनी मराठी समूदायाची तुलना बलात्कारी लोकांसोबत करणारे वक्तव्य केलं. त्यामुळे आता सर्व स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आलोक शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार केली आहे. 


बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर आजतक या वृत्त वाहिनीवर चर्चा सुरू होती. त्यावर एका प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा यांनी भाजपच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारला. बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या मराठी माणसांचं रक्षण भाजप पक्ष करणार का असा सवाल त्यांनी विचारला. बदलापूरमध्ये एखाद्या मराठी व्यक्तीने बलात्कार केला तर त्यावेळीही भाजप त्यांना पाठीशी घालणार का? असा प्रश्न आलोक शर्मा यांनी विचारला. आलोक शर्मांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.


सोशल मीडियावर आलोक शर्मा यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली. महाराष्ट्रात राहून मराठी माणसावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदनीय असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. भाजप नेत्यांनीही यावर जोरदार टीका केली असून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी यावर राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे. 


शिवसेनेकडून तक्रार दाखल


मराठी माणसाबद्दल आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या अलोक शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार नोंद केली आहे. अलोक शर्मा यांना काँग्रेसने काढून टाकावं, त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी केली आहे. 


 






ही बातमी वाचा: