Amit Shah on Gujarat Riots : गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले आरोप हे राजकीय सुडातून झाले असल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले. मोदींवर झालेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. मोदींचे नेतृत्व हे सोन्यासारखं झळाळून निघालं असल्याचे शाह म्हणाले. 2002 साली गुजरात मध्ये झालेले दंगे हे सुनियोजीत नव्हते तर स्वप्रेरीत होते. गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेस जाळल्यामुळं दंगल उसळली असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी एनजीओच्या मागणीनंतर एसआयटी (SIT) ची स्थापना करण्यात आल्याचे शाह यांनी सागंतिले. एएनआय (ANI) न्यूजला अमित शाह यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.


लष्कर बोलावण्यात कोणताही दिरंगाई नाही


दरम्यान, 2002 मध्ये झालेले दंग रोखण्यासाठी लष्कर बोलावण्यात कोणताही दिरंगाई करण्यात आली नव्हती. मात्र, याप्रकरणी मोदींवर अनुक चुकीचे आरेप करण्यात आले होते. ते आरोप चुकीचे असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं. तिस्ता सटेलवाड यांच्या एनजीओनं चुकीचं आरोप केले होते. एनजीओ आणि माध्यम यांच्या अभद्र युतीनं चुकीचं चित्र निर्माण केलं होते. यावेळी झालेल्या गोळीबारात फक्त मुस्लिमांचा मृत्यू झाल्याची बाब कोर्टानं देखील अमान्य केली आहे. हिंदूना जाळल्याच्या घटनेचा निषेधही कोणी केला नसल्याचं शाह यांनी सांगितलं.




माझ्या हाताने अनेकांचे अंत्यसंस्कार केले


दंगली प्रकरणी अनेक खोटया बातम्या पसरवण्यात आल्या होत्या असेही शाह यांनी सांगितले. मात्र, मोदींवर केलेल्या आरोपांना जनतेनं स्वीकारलं नाही. या आरोपानंतरही मोदी धैर्यानं लढले. या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप होणं शक्यत नव्हते, असेही शाह यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा मोदींसाठी आत्मसंतोष तर कार्यकर्त्यांसाठी गौरव असल्याचे शाह म्हणाले. गोध्रामध्ये ट्रेन जाळल्यामुळं दंगल उसळली. यावेळी मी माझ्या हाताने अनेकांचे अंत्यसंस्कार केले. गोध्रा हत्याकांडातील मृत्यू झालेल्यांची परेड काढली हा आरोप देखील चुकीचा असल्याचं शाह यांनी सांगितलं. साठ जण जाळल्यानं गोध्रात आक्रोश उसळला होता असेही शाह म्हणाले.





माझ्यावर खोटे आरोप करुन अटक


माझ्यावर खोटे आरोप करुन मला अटक करण्यात आली होती असेही शाह यांनी सांगितले. अटक झाल्यानंतर पक्ष माझ्यासोबत नव्हता हा आरोपही खोटा आहे. जनतेनं या आरोपांनी स्वीकरलं नसल्याचे शाह यांनी सांगितलं. दंगलीला प्रोत्साहन देतो हा आरोप देखील खोटा आहे. सेशन कोर्ट ते सुप्रीम कोर्ट सर्वांनी एकच निर्णय दिल्याचं त्यांनी सांगितलं.