VIDEO : पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण, महिला न्यायाधीश निलंबित
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2017 10:59 AM (IST)
मारहाणीच्या प्रकरणात देहरादूनमधील प्रेम नगर पोलिस स्थानकात न्यायाधीश जया पाठक यांचा मुलगा रोहनसह काही जणांना हजर करण्यात आलं. आपल्या मुलाला पोलिस स्थानकात आणल्याचं समजताच खवळलेल्या जया पाठक पतीसह तिथे दाखल झाल्या.
NEXT PREV
अलाहाबाद : महिला न्यायाधीशाने पोलिस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावून त्याची वर्दी फाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून उत्तर प्रदेशच्या महिला न्यायाधीशाला निलंबित करण्यात आलं आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या प्रशासकीय समितीच्या आदेशानुसार हायकोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलने आरोपी न्यायाधीश जया पाठक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. जया पाठक यांचा मुलगा रोहन देहरादूनमधील एका खाजगी विद्यापीठात शिकतो. 12 सप्टेंबरला मारहाणीच्या प्रकरणात देहरादून मधील प्रेम नगर पोलिस स्थानकात रोहनसह काही जणांना हजर करण्यात आलं. आपल्या मुलाला पोलिस स्थानकात आणल्याचं समजताच खवळलेल्या जया पाठक पतीसह तिथे दाखल झाल्या. जया यांनी पोलिस स्थानकातच गोंधळ घालायला सुरुवात केली. एका कॉन्स्टेबलने त्यांचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करताच जया पाठक यांनी त्याच्या कानशिलात लगावून वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टाच्या निर्देशानुसार उत्तराखंड पोलिसांनी देहरादूनच्या प्रेम नगर पोलिस स्टेशनमध्ये जया पाठकांविरोधात केस दाखल केली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात त्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. जया पाठक यांचा व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणारा पोलिस कॉन्स्टेबलविरोधात एफआयआर दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पाहा व्हिडिओ :