मुंबई : नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या विरोधात डॉक्टरांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. राष्ट्रीय वैद्यक परिषद बरखास्त करुन राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला देशभरातील डॉक्टरांकडून कडाडून विरोध केला जात आहे. विरोधकात सुधारणा कराव्यात या मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वीही डॉक्टरांनी आंदोलन केले होते. आता हे विधेयक सभागृहात चर्चेसाठी ठेवण्यात येणार असल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.
देशभरातील साधारण तीन लाख डॉक्टर्स या संपात सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.
काय आहे नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक?
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक 2017 आणण्याच्या तयारीत सरकार आहे. या विधेयकातील तरतुदीनुसार मेडिकल कॉलेज प्रशासनाला एकूण जागांच्या 60 टक्के जागांचं शुल्क ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे. यापूर्वी केवळ 15 टक्के जागांवरील शुल्क कॉलेज प्रशासन ठरवू शकत होतं.
तसंच डॉक्टरांच्या देशपातळीवरील समितीत बिगरवैद्यकीय व्यक्तींचा सहभाग वाढणार आहे.
एमबीबीएसच्या परीक्षेनंतर आता डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्यासाठी आणखी एक परीक्षा द्यावी लागणार.
आयुष ब्रिज कोर्सला एमबीबीएसच्या समांतर स्थान या विधेयकामुळे मिळणार आहे.
बिहार निवडणक एक्झिट पोल 2025
(Source: Poll of Polls)
देशभरातील डॉक्टर आज एकदिवसीय संपावर
एबीपी माझा वेब टीम Updated at: 28 Jul 2018 11:43 AM (IST)
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या विरोधात डॉक्टरांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे.
प्रातिनिधिक फोटो