नवी दिल्ली: देशातील लोकसभा आणि सर्व राज्यातील विधानसभेची निवडणूक एकत्रित घ्यावी, असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या भारतीय निवडणुकीबाबतच्या Unfolding Indian Election-Journey of the Living democracy या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.


''जर देशातील सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगानं एकत्रित येऊन निर्णय घेतला, तर हे सहज शक्य आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल,'' असंही मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं.

''याशिवाय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून, तिला अजून सक्षम केले पाहिजे. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देश आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे,'' असंही त्यांनी यावेळी सांगितलं.