मुंबई : नोटाबंदीनंतर घरातील सोन्याबाबत पसरल्या जाणाऱ्या अनेक अफवा मोदी सरकारने खोडून काढल्या आहेत.

सोन्याबाबत कोणताही नवा नियम केलेला नाही, तसंच कोणतंही नवं बंधन घातलेलं नाही, असं सरकारने स्पष्ट केलं.

सोन्याबाबत तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं


*1) तुमचं सोनं सुरक्षित आहे का?*

- होय,

*2) मग सोनं बाळगणाऱ्या कुणाला भीती आहे?*

- ज्यांनी काळा पैसा सोन्यात रुपांतरीत केला, विशेषत: 8 नोव्हेंबरनंतरच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर, विनाकारण मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली, ज्याचा हिशेब देऊ शकत नाही, त्यांना भीती

www.abpmajha.in

*3) तुम्ही किती सोनं बाळगू शकता किंवा खरेदी करू शकता?*

- उत्पन्नाच्या प्रमाणात कितीही, ज्याचा तुम्ही हिशेब देऊ शकाल.

*4) आयकर विभागाचा छापा कुणाच्या घरी पडू शकतो?*

- उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमा केली तर, सोप्या भाषेत बेहिशेबी संपत्ती असेल तर/ उत्पन्नांमध्ये तफावत आढळल्यास.

www.abpmajha.in

*5) आयकर विभागाचा छापा पडला तर ते घरातील सोनं जप्त करतील का?*

- नाही.

*6) तुमच्याकडे वंशपरंपरेनं चालत आलेले सोन्याचे दागिने घरात आहेत, त्याचं काय होणार?*

- त्याचा हिशेब कोणीही मागणार नाही, मात्र ते वंशपरंपरेने मिळाल्याचं पटवून द्यावं लागेल.

*7) वंशपरंपरेने मिळालेलं सोने भरपूर, पण सध्याचं उत्पन्न करपात्र नाही तर मी काय करावं?*

-  तुम्हाला काहीही घाबरण्याचं कारण नाही. जर विचारणा झाली, तरच वंशपरंपरेच्या दागिन्याबाबत पटवून द्यावं लागेल.  संपत्ती कर 2015 सालीच रद्द करण्यात आला आहे.

www.abpmajha.in

*8) घरातील पारंपरिक दागिने मोडून त्यात भर घालून नवे दागिने केलेत, त्याचं काय होणार?*

- तुम्ही ज्या सराफाकडून दागिने बदलून घेतले, त्याबाबतच्या पावत्या असणं आवश्यक.

*9) सोन्यावरही कर/दंड लागणार का?*

- नाही. संपत्ती कर 2015 सालीच रद्द करण्यात आला आहे.

*10) सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी?*

- सराफाकडून पक्की पावती घेणे आवश्यक आहे. थोड्याशा मोहापायी मोठा धोका पत्करु नका.

 जर तुमच्याकडे आयकर विभागाकडून छापा पडला तर?

समजा, घरातील एका पुरुषाकडे 15 तोळे सोने आहेत. तर नियमानुसार पुरुषाकडील 10 तोळे सोन्याचा हिशेब कोणीही मागणार नाही. पण वरील 5 तोळे सोन्याचा हिशेब द्यावा लागेल. मात्र जर ते पारंपारिक सोने असल्याचं पटवून दिल्यास काहीही होणार नाही. मात्र..

हिशेब न दिल्यास, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत करून, ते तुमच्या उत्पन्नात जोडलं जाईल. मग त्यावर कर आकारणी होईल.

संबंधित बातम्या

तुमचं सोनं, मोदी सरकार आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर


तुमच्याकडे किती सोनं? सरकारची करडी नजर