नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका जिवंत दहशतवाद्याला पडकण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. हा दहशतवादी जवानांनकडील शस्त्रास्त्र घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे, या दहशतवाद्याने कॅमेरासमोर आपला गुन्हा ही कबुल केला आहे.
या दहशतवाद्याचं नाव मुनीब असं असून, हा दहशतवादी गणेशपुरामधील बिजबेहराचा रहिवासी आहे.
काल दुपारी दोनच्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी लाल चौकातील एका बँकेच्या शाखेवर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानावर गोळीबार केला. यानंतर हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी पळून गेला. पण त्याचा साथीदार मुनीबला पकडण्यात जवानांना यश आलं.
दुपारी ज्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी बँकेतील कर्मचारी नमाज पठण करत होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.
मुनीब जखमी जवानांकडील बंदूक घेऊन जात असताना, सीआरपीएफच्या जवानांनी त्याला पकडलं.