अक्षयच्या संकल्पनेतील जवानांच्या वेबसाईटला देणाऱ्यांचे हजारो हात
एबीपी माझा वेब टीम | 28 Apr 2017 11:09 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार याच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'भारतकेवीर' या जवानांना मदतीचा हात देणाऱ्या सरकारी वेबसाईटला दात्यांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे. सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी देणाऱ्यांचे हजारो हात सरसावले आहेत. bharatkeveer.gov.in (भारतकेवीर.जीओव्ही.इन) ही वेबसाईट 9 एप्रिलला अक्षय कुमार आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आली होती. निम्नसैनिक दलातील कोणत्याही शहीद जवानाच्या कुटुंबीयांना या वेबसाईटच्या माध्यमातून थेट मदत (15 लाख रुपयांपर्यंत) करता येते. शुक्रवारी या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या सुकमातील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना 12 तासांच्या आत भरभरुन मदत करण्यात आली आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना किती मदत? (पहिल्या 12 तासांत जमा रक्कम) हेड कॉन्स्टेबल के. पी. सिंग यांच्या पत्नी आणि आईला 31 हजार 612 रुपये एएसआय नरेश कुमार यांच्या कुटुंबीयांना 28 हजार 851 रुपये एएसआय संजय कुमार यांच्या कुटुंबीयांना 25 हजार 821 रुपये