लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये पिता-पुत्रांमध्ये सुरु असलेला संघर्ष समाजवादी पक्षांच्या फुटीनंतरच थांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज दुपारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ते पक्षासंदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सायकल चिन्हावर मुलायम सिंह यांच्या गटानं दावा ठोकल्यानंतर आज अखिलेश गट देखील सायकल चिन्हासाठी आपला दावा करणार आहे. आपल्याकडे 212 आमदारांचं पाठिंबा असल्याचं अखिलेश यांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भातील शपथपत्रही अखिलेश यांच्याकडून निवडणूक आयोगाला दिलं जाणार आहे.
एकाच पक्षात असूनही अखिलेश, मुलायम सिंह आणि शिवपाल यादव यांनी 3 स्वतंत्र उमेदवारांच्या याद्या तयार केल्या होत्या. ज्यात आपल्या समर्थक उमेदवारांना डावललं गेल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. तेव्हापासून समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.