मुंबई: वाहन चालवण्याचा परवाना काढायचा असेल, तर आता आधीपेक्षा पाचपट पैसे मोजावे लागणार आहेत. ड्रायव्हिंग टेस्टसाठी आधी 40 रुपये मोजावे लागत होते. त्याऐवजी आता 200 रुपये फी आकारली जाईल.


लायसनचं नुतनीकरण करायचं असेल तर 300 रूपयांसोबत 1 हजार रुपये अधिक भरावे लागणार आहेत. नवीन फी दरानुसार मॅन्युअल फिटनेस टेस्टसाठी 600 रुपये आणि ऑटोमॅटेड फिटनेस टेस्टसाठी 1 हजार रुपये भरावे लागतील.

वाहन परवाना काढण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने वाहन चालकांच्या खिशाला या निर्णयानं कात्री लागणार आहे.