श्रीनगरमध्ये मुस्लिम धर्मगुरु फडकवणार एक हजार तिरंगे
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2016 07:37 AM (IST)
नवी दिल्ली : सूफी संत ख्वाजा साहेब यांच्या दर्ग्यात मुस्लीम धर्मगुरु एक हजार तिरंगे फडकवणार आहेत. दर्ग्याचे प्रमुख बादिम पीर नसीम मिया चिश्ती यांनी श्रीनगरमधील दर्ग्यात एक हजार तिरंगे फडकवण्याबाबत घोषणा केली. ख्वाजा साहेबांच्या दर्ग्याशी निगडीत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये देशभक्तीची भावना आहे. त्यामुळे दर्गाह दिवान जेव्हा जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवतील, त्यावेळी समर्थक एक हजार तिरंग फडकवतील, अशी माहिती नफीस चिश्ती यांनी दिली. काश्मीरमधील शांततेच्या प्रश्नी 10 एप्रिल रोजी अजमेरमध्ये झालेल्या परिषदेत दिवान आबेदिन यांनी तिरंगा फडकवण्यासाठी श्रीनगरला जाणार असल्याची माहिती दिली होती. मात्र तारखेबाबत अद्याप निश्चित माहिती नाही.