Ajit Doval Spy Story : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या (India Pakistan Tension) पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते लष्कराच्या तिन्ही दलप्रमुखांपर्यंत अजित डोवाल प्रत्येक चित्रामध्ये दिसून येतात. खरेतर, परदेशापासून ते भारतीय भूमीपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेची आखणी आणि अंमलबजावणी याची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. म्हणूनच अजित डोवाल यांना भारताचा जेम्स बॉण्ड असेही म्हणतात. त्यांनी पाकिस्तानसह (Pakistan) अनेक देशांमध्ये भारतीय मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबद्दल ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे की त्यांनी 'रॉ' एजंट म्हणून पाकिस्तानमध्ये 7 वर्ष घालवली होती. या काळात ते गुप्तपणे पाकिस्तानमध्ये राहून भारतासाठी काम करत होते. मात्र, पाकिस्तानमध्ये त्यांच्या तैनातीदरम्यान एकदा ते धर्मसंकटात सापडले आणि त्यांची ओळख उघड होण्याची वेळ आली होती.

भारताच्या 'जेम्स बाँड'ने सांगितला थरारक किस्सा

अजित डोवाल यांनी यासंबंधीचा किस्सा स्वतःच माध्यमांमध्ये सांगितला होता. एका मीडिया ब्रीफिंग दरम्यान त्यांना विचारण्यात आलं की, पाकिस्तानमध्ये मुस्लीम बनून राहत असताना त्यांना कधी धर्मसंकटाचा सामना करावा लागला का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित डोवाल म्हणाले की, ते पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एका मजारजवळ थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या जवळ एक व्यक्ती येतो आणि विचारतो, "तू हिंदू आहेस का?" त्यावर ते हिंदू असल्याचे नाकारतात.

अजित डोवाल यांनी सांगितले की तो व्यक्ती त्यांना एका खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, "तुमचे कान टोचलेले आहेत आणि हे फक्त हिंदूच करतात." त्यानंतर अजित डोवाल ते हिंदू आहेत याचा स्वीकार केला होता. यावर तो व्यक्ती त्यांना सल्ला देतो की, "तुमच्या कानाची प्लास्टिक सर्जरी करून घ्या." अजीत डोभाल पुढे असेही म्हणाले की, तो व्यक्ती देखील हिंदूच होता आणि वेश बदलून पाकिस्तानमध्ये राहत होता, असेही त्यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा 

India Pakistan War: कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू म्हणणाऱ्या चीनचा अजित डोवालांना फोन, म्हणाले....