India Pakistan war : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा (India Pakistan war) निर्णय घेण्यात आला होता. दोन्ही देशांनी परस्पर संमतीने युद्धबंदी तात्काळ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अवघ्या 3 तासातच पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतावर पुन्हा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच सीमाभागात गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेवंर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

नेमकं काय म्हणाले अशोक गेहलोत? 

भारत पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेनंतर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट ट्वीटवरवर शेअर केली आहे. "इंदिराजी, आज संपूर्ण देश तुमची आठवण काढत आहे." असे म्हणत गेहलोत यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटोही शेअर केला आहे.

 5 वाजल्यापासून युद्धबंदी 

भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार 10  मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून तिन्ही सैन्यांकडून सर्व प्रकारच्या गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवल्या जातील. या निर्णयाचे देशभरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. सामान्य लोकांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत, सर्वजण दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक धाडसी पाऊल मानत आहेत. या निर्णयाचे देशभरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. सामान्य लोकांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत, सर्वजण दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक धाडसी पाऊल मानत आहेत. जर ही युद्धबंदी दीर्घकाळ टिकली तर ती प्रादेशिक स्थिरता आणि विकासाचा मार्ग मोकळा करू शकते, असे राजनैतिक तज्ज्ञांचे मत आहे. त्याच वेळी, काही लोकांचा असा विश्वास आहे की युद्धबंदी आता करायला नको होती. भारत आणि पाकिस्तानमधील शेवटचे निर्णायक युद्ध 1971 मध्ये झाले जेव्हा पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली. त्यामुळेच आज एक वर्ग माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवत काढत आहे.

युद्धबंदी झाल्यानंतर पाकिस्तानने केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरसर राजस्थानच्या जैसलमेर, बाडमेरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु करण्यात आला आहे. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कच्छमधील सीमावर्ती भागातही पाकिस्तानचे ड्रोन दिसले आहे. श्रीनगरमध्ये स्फोटांचा आवाज आल्याची माहिती मिळाली आहे. बारमेरमध्ये एकामागोमाग ड्रोन दिसले आहेत. सीमावर्ती अनेक भागांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने 11 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. आत्तापर्यंत 9 शहरांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर शस्त्रसंधीचं काय झालं? असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.  

महत्वाच्या बातम्या:

पाकिस्तान सुधारणार नाही, इंदिरा गांधींसारखी कणखर भूमिका घ्या, बलुचिस्तानला स्वतंत्र करत पाकचे दोन तुकडे करा : रोहित पवार