India Pakistan ceasfire viloaton: भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी संध्याकाळपासून भारतासोबत शस्त्रसंधी करण्याचे मान्य केले होते. त्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला होता. परंतु, शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानकडून भारतावर पुन्हा एकदा हल्ला (ceasefire violation) करण्यात आला होता. यानंतर भारतीय सैन्यालाही (Indian Army) पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर  भारताचा शेजारी असलेला चीन (China) सातत्याने पाकिस्तानची (Pakistan) तळी उचलून धरताना दिसत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी राहू, असे चीनकडून सांगण्यात आले.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही फोनवरुन संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय पर्यटकांना ठार मारण्यात आल्यामुळे दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करणे गरजेचे होते, असे अजित डोवाल यांनी म्हटले. भारताला युद्ध नको आहे. युद्ध कोणाच्याच हिताचे नसते. आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीच्या कराराशी कटिबद्ध आहोत. आम्ही क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित होईल, अशी आशा करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

यावेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले की, आम्ही पहलगान दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. आमचा कोणत्याही स्वरुपातील दहशतवादाला विरोध आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशांत असून या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे. आशियाई क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे खूप अवघड आहे. आपण ही गोष्ट जपली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी असून त्यांना वेगळे करता येणार नाही, असे वांग यी यांनी म्हटले.

चीनकडून भारत-पाकिस्तानला शांततेचं आवाहन

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांतता आणि संयम राखावा. चर्चा आणि विचारविनिमय करुन मतभेदांवर तोडगा काढावा आणि परिस्थिती चिघळण्यापासून रोखावे. ही गोष्ट भारत आणि पाकिस्तान यांच्या हिताची असून आंतरराष्ट्रीय समुदायालाही हीच गोष्ट हवी असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

आणखी वाचा

परराष्ट्र सचिवांच्या एकाच दिवसात 3-3 पत्रकार परिषदा, शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग, मोठा निर्णय होणार?

पाकड्यांची पुन्हा मुजोरी, PM शाहबाज शरीफ यांची शिरजोरी; म्हणाले, हा आमच्या तत्वांचा आणि सन्मानाचा विजय...