मुंबई : वाय-फाय तंत्रज्ञान हे नवीन राहिले नसले तरी त्याचा वापर आता घराघरांमध्ये होताना दिसतो. घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आहे. या सर्वांना डेटा पॅकचा रिचार्ज न करता इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी प्रत्येक घरात इंटरनेटसाठी वाय-फाय राऊटर लावण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढत आहे.


मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही राऊटरला एकाचवेळी  कनेक्ट असल्याने त्याचा परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर होतो. कमी इंटरनेट स्पीडमुळे कामाचा देखील खोळंबा होतो. आपले ब्रॉडबँड कनेक्शन हे आपले इंटरनेट स्पीड कमी होण्याचे कारण नाही आहे. अनेक लोक इंटरनेट स्पीड कमी असेल तर कनेक्शनला जबाबदार ठरवतात. परंतु याचे मुख्य कारण कमी क्षमता असलेला राऊटर आहे.


या समस्येवर टेक जॉइंट एअरटेलने तोडगा काढला आहे. एअरटेलने आपला फायबर प्लॅनचा स्पीड 1GBPS पर्यंत आणला आहे. पण त्याचबरोबर एअरटेलने असे राऊटर बनवले आहे. जे 1GBPS वायफाय स्पीडला सपोर्ट करते. फक्त एवढेच नाही तर एअरटेलच्या या राऊटरला एका वेळी अनेक डीव्हाईस कनेक्ट केले तरी वायफायच्या स्पीडवर काहीच परिणाम होत नाही.


या गोष्टीवर लवकर विश्वास बसणे शक्यच नाही. यासाठी आम्ही तुम्हाला एक उदाहरण देतो. 1GBPS स्पीड म्हणजे 4K रिजॉल्यूशनचा 4GB साईजचा व्हिडीओ तुम्ही फक्त 3 मिनीटात डाऊनलोड करू शकता. जर तुम्ही कम्प्युटरवर ऑनलाईन गेम खेळत असाल तर तुम्हाला 95 जीबीचे अपडेट डाऊनलोड करण्यासाठी 20 मिनीटाचा वेळ लागेल.


एअरटेलचे नवे वायफाय राऊटर फक्त तुम्हाला वेगवान इंटरनेट देत नाही तर याची रेंज देखील दूरपर्यंत मिळते. रेंज दूरपर्यंत मिळवण्यासाठी वायफाय राऊटरमध्ये चार अँटीना लावण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही हॉलमध्ये राऊटर बसवून संपूर्ण घरभर हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता.


आता तुम्ही विचार करत असाल की एवढ्या सुविधा देणारा राऊटर महाग असेल? परंतु कंपनी 1GBPS वायफाय प्लॅनसोबत फ्री राऊटर देत आहे. राऊटरसाठी तुम्हाला एकही रूपया देण्याची गरज नाही.


सुरुवातीपासूनच एअरटेल आपल्या ब्रॉडबँड सर्व्हिसमध्ये पुढे आहे. अनेक कंपन्या 1GBPS स्पीड देण्याबद्दल बोलतात. परंतु एअरटेल खरच आपल्या ब्रॉडबँड सर्व्हिसमध्ये 1GBPS स्पीड देते. आज इंटरनेट हा आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठी कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी कायम काही तरी नविन घेऊन येत असते.