नवी दिल्लीः वेतनवाढीच्या मागणीनंतर खासदारांनी विमान प्रवासाच्या भाड्यात सवलत देण्याची मागणी केली आहे. खासदारांच्या वेतनवाढीसाठी असलेल्या समितीची विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली. त्यामध्ये विमान प्रवासात सवलत देण्याची मागणी केली.


अशा आहेत खासदारांच्या मागण्या

  • विमानात खासदारांसाठी आरक्षित जागा असावी.

  • विमानतळावर खासदारांना स्पेशल ट्रीटमेंट मिळावी.

  • विमानात पुढच्या जागा खासदारांना मिळाव्या.

  • विमान तिकिट शुल्कात सवलत मिळावी.

  • विमान प्रवासात खासदारांना जेवन मोफत मिळावं.


 

दरम्यान एअरलाईन्स कंपन्यांनी खासदारांच्या या मागण्या फेटाळून लावल्या आहेत. खासदारांना सध्या तिकिटाच्या 25 टक्के रक्कमेत 34 वेळा विमान प्रवास करता येतो. मात्र देशात अनेकांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही, रुग्णालयात जाण्यासाठी व्यवस्थित रुग्णवाहिका नाहीत, पण खासदारांनीच विमान प्रवासात मोफत अन्न आणि भाड्यात सवलत मागितल्यामुळे या अजब मागण्यांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.