हेडलाईन्स

नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली सुरक्षा समितीची बैठक सुरु, शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत चर्चा, पाकिस्तानसोबतचा करार तोडण्याचा विचार

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या घंटागाडीवर आपटून अडीच वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, खेळताना धावत येऊन गाडीवर आपटला, बोर्डिंग रोडवरील घटना

----------------------

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीची बैठक, सर्व जिल्हा प्रभारी उपस्थित,  आगामी निवडणूक तसंच मराठा मोर्चाचा बैठकीत आढावा

----------------------

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक मंदावली, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर अमृतांजन पुलाजवळ ट्रकने पेट घेतला, वाहतूक धिम्या गतीने सुरु

----------------------

1. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का, सार्क परिषदेवर भारतासह, अफगाण आणि भूतानचाही बहिष्कार, परिषदच रद्द

----------------------

2. मराठ्यांच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन घ्या, शिवसेना नेत्यांसह आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता

----------------------

3. संजय राऊत दिसतील तिथे फटके मारणार, काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचं व्यक्तव्य, राऊतांनी मराठा समाजाचा अपमान केल्याचा आरोप

----------------------

4. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत खड्ड्यांवरुन रणकंदन, विरोधकांसोबत भाजपचाही सभात्याग, खड्डे बुजवण्यासाठी 5 ऑक्टोबरची नवीन डेडलाईन

----------------------

5. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताच्या दृश्याने वसई हादरली, स्कूलबसने दुचाकीस्वाराला फरफटत नेलं, सीसीटीव्हीत अपघात कैद

----------------------

6. अहमदनगरच्या श्रीगोंद्यातून 18 परप्रांतीय मजुरांची सुटका, शेतकामासाठी मजुरांचा 10 हजारात सौदा झाल्याचं उघड

----------------------

7. बीसीसीआयच्या निवड समितीतून खोडा आणि परांजपेंना डच्चू मिळण्याची शक्यता; कसोटी क्रिकेटचा अनुभव नसल्याने लोढा समितीचा निकष डावलल्याचं निष्पन्न

----------------------

8 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेची धमकी, तर कलाकारांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा, सैफअली खानचं मत

----------------------

एबीपी माझा वेब टीम