चेन्नई : रमजाननिमित्त एअर एशियाने आपल्या देशांतर्गत विमान प्रवासासाठी खास सवलती दिल्या आहेत. ग्राहकांना 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2017 दरम्यानच्या विमान प्रवसासाठी 786 रुपये भरून तिकीट बुक करता येणार आहे.


ही स्पेशल ऑफर ग्राहकांना 10 जुलैपर्यंत उपलब्ध राहणार आहे. ''एअर एशियाने सुपरमॅनप्रमाणे आकाशात झेप घ्यावी, यासाठी या स्पेशल स्किमची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रवाशांना बंगळुरू आणि नवी दिल्लीच्या यात्रेकरूंना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी फक्त 786 रुपये खर्च करावे लागणार आहेत,'' असे कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

 

याशिवाय कंपनीने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या दरातही सवलती दिल्या आहेत. ऑकलँड, मॉरिशस, ग्वांजू, काब्री, लोंबोक आदींच्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी मात्र 2,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

 

देशांतर्गत प्रवासासाठी कोची ते बंगळुरू, गोवा ते बंगळुरू,  दरम्यान 786 रुपये तिकीट दर ठेवण्य़ात आला आहेत. या विमान प्रवासाच्या दरांचा लाभ ग्राहकांना 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2017 दरम्यानसाठी मिळणार आहे. याशिवाय इंफाळ ते गोवाहटी यासाठीही प्रवाशांना 786 रुपये दर द्यावा लागणार आहे. तर विशाखापट्टणम ते बंगळुरू आणि पुणे ते बंगळुरू दरम्यानच्या विमान प्रवासासाठी 1786 रुपये भरावे लागणार आहेत.