Health Tips :  हवामानातील बदलांमुळे वायू प्रदूषणदेखील (Air Pollution) मोठ्या प्रमाणात पसरत चाललं आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक लक्षणीयरीत्या खालावला आहे. यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा दिवसेंदिवस प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. वर्षातील हा काळ आरोग्याच्या (Health Tips) दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. या काळात तुम्हाला विविध प्रकारचे फुफ्फुसाचे संक्रमण आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात. हे सर्व लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला आरोग्याशी निगडीत अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही फुफ्फुस किंवा श्वसनाचे आजार टाळू शकता. 


सध्या हवेतील प्रदूषण वाढत आहे. त्यातही दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच फटाके फोडल्याने हवेची गुणवत्ता आणखी खराब होईल, प्रदूषणात वाढ होईल. ही वेळ तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवते. प्रदूषणामुळे तुमच्या शरीरावर अनेक संसर्ग होतात. यासाठी आरोग्य तज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही प्रदूषणामुळे होणार्‍या श्वसन संसर्गापासून मुक्त होऊ शकता.


घरी आल्यानंतर हात आणि चेहरा धुवा


आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सांगतात की, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळायचा असेल तर घरी आल्यानंतर सर्वात आधी चेहरा, हात आणि पाय धुवा. कारण जेव्हा आपण घरी येतो तेव्हा अनेक प्रकारचे जंतू आपल्याबरोबर येतात. अशा परिस्थितीत सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल महत्त्वाचे आहे.  


कोमट पाणी प्या


हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने सर्दी आणि फ्लूपासून तुमचा बचाव होतोच पण घशातील धुळीचे कणही निघून जातात. हे केवळ फुफ्फुसाच्या संसर्गापासून तुमचे संरक्षण करत नाही तर सर्दी आणि खोकल्यामध्ये देखील उपयुक्त आहे.


मास्क वापरा


तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता त्यावेळी मास्कचा वापर करा. मास्क घातल्याने श्वास घेताना कोणतेही प्रदूषक शोषून घेण्यापासून रोखता येते.


आलं-लिंबाचा चहा प्या


सकाळी लिंबू-आल्याचा चहा प्यायल्याने तुमच्या श्वसनमार्गामध्ये असलेले कोणत्याही प्रकारचे जंतू नष्ट होतात. यामुळे तुमच्या शरीरावरील संसर्गाचा परिणाम तर थांबेलच पण शरीराला पोषणही मिळेल. आपल्या आहारात हळदीचाही समावेश करा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल.


घरामध्ये हवा शुद्ध करणारी झाडे लावा


घरामध्ये आणि आजूबाजूला हवा शुद्ध करणारी झाडे लावा. स्नेक प्लांट, डेव्हिल आयव्ही, बांबू पाम आणि इतर अनेक वनस्पती एक चांगला पर्याय असू शकतात.


गरम पाण्याची वाफ घ्या 


जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर दररोज काही मिनिटं वाफ घ्या. त्यामुळे दररोज वाफ घ्या. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी