Male Passenger Urinated on Woman in Air India : एअर इंडियाच्या (Air India) फ्लाईटमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतून दिल्लीला येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता विमान वाहतूक नियामक मंडळाने (DGCA) आणि एअर इंडियाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. डीजीसीएने म्हटले की, आम्ही एअरलाइनकडून अहवाल मागवला असून आणि निष्काळजीपणा करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ही घटना अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या विमान प्रवासात घडली आहे. 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून एक महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान मद्यधुंद असलेल्या एका व्यक्तीने महिलेवर लघुशंका केली. या संदर्भात एअर इंडियाने 26 नोव्हेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हे विमान जेएफकेहून दिल्लीला जात होते.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने या घटनेनंतर एक समिती गठित करण्यात आली आहे. प्रवाशाला 'नो-फ्लाई लिस्ट' मध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे प्रकरण सरकारी समितीच्या अखत्यारीत्या असून निर्णयाची प्रतीक्षा आहे.
New York-Delhi Air India Flight : काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानात मद्यधुंद व्यक्तीने एका 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केली. ज्येष्ठ महिलेने या संदर्भात केबिन क्रू ला माहिती दिली आहे. त्यानंतर देखील त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची चौकशी महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर सुरू झाली.
महिलेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की , मद्यधुंद अवस्थेत असलेला प्रवासी माझ्यासमोर आला, त्याने माझ्यासमोर लघुशंका केली. क्रू मेंबरकडून देखील घेण्यात आली नाही. मला क्रू मेंबरकडून प्रतिसाद उशीरा मिळाला. लघुशंका केल्यामुळे माझे कपडे आणि इतर वस्तू खराब झाल्या.
New York-Delhi Air India Flight ; एअर एशियाच्या विमानातही आढळला होता साप
एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) विमानात साप (Snake in Plane) आढळल्याने प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. एअर इंडिया एक्स्प्रेसचे केरळहून (Kerala) निघालेले विमान शनिवारी दुबई (Dubai) विमानतळावर उतरले, तेव्हा त्याच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला
इतर महत्त्वाच्या बातम्या :