Air India Express Emergency Landing : केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर (Trivandrum International Airport) आज (शुक्रवार, 24 फेब्रुवारी रोजी) गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. वास्तविक, कालिकतहून दम्मामला जाणाऱ्या विमानाला आपत्कालीन लँडिंगसाठी दुसऱ्या बाजूला वळवावं लागलं. उड्डाण वळवल्यानंतर लगेचच तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्णपणे आपत्कालिन परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.
विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान दुपारी 12.15 वाजता विमानतळावर उतरवण्यात आले. इमर्जन्सी लँडिंग दरम्यान, विमानात सुमारे 182 प्रवासी होते. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. विमान लॅंडींगच्या दरम्यान विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पायलटला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच विमान तिरुअनंतपुरमच्या दिशेने वळवण्यात आले.
विशेष बाब म्हणजे, याआधी रविवारी देखील विमान कंपनीला दुबई-तिरुवनंतपुरम मार्गात तांत्रिक बिघाडाची समस्या आली होती. आजही असाच प्रकार घडल्याने विमानतळ प्रशासन तसेच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेपाळ विमान अपघातात 72 जणांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये विमानाचा मोठा दुर्देवी अपघात झाला. या दुर्घटनेत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. यती एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात होऊन ही दुर्घटना घडली. या अपघातात विमानाच्या सहवैमानिक (Co-pilot) अंजू खतिवडा (Anju Khtivada) यांचंही निधन झालं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :