अकबरुद्दीन ओवेसी हैदराबादमधील चंद्रयानगुट्टाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यानच त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु होते.
2011 मधील एका घटनेत त्यांना गोळी लागली होती आणि चाकूने ते जखमी झाले होते. गोळी अकबरुद्दीन ओवेसी यांच्या कण्याजवळ लागली होती. अकबरुद्दीन ओवेसी त्याचाच इलाज लंडनमधील एका खासगी रुग्णालयात करत आहेत.
तीन दिवसांपूर्वी अकबरुद्दीन यांना पुन्हा एकदा उलट्या होऊ लागल्या आणि पोटात दुखायला लागलं. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती सुधारावी, यासाठी प्रार्थना केली आहे. वायएस जगन मोहन रेड्डी यांनी ट्वीट करुन अकबरुद्दीन यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याबाबतचं ट्वीट केलं आहे.