Corona Sero Survey : कोरोना व्हायरसची (Corona Virus) दुसरी लाट आता आटोक्यात आलेली दिसत आहे. मात्र या दुसर्‍या लाटेत भारतात रुग्णसंख्या वेगाने वाढली. आता तज्ञांनी भारतात या जीवघेण्यात आजाराच्या तिसर्‍या लाटेविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यात मुले आणि तरुण वयोगटातील सर्वांत जास्त प्रभावित होण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. या वयोगटात सेरोलॉजिकल प्रसार होण्यासंबंधी डेटाचा अभाव दिसून येत आहे. यासाठी तज्ञांना मदत व्हावी आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्याच्या उपाययोजनात मदत करण्याच्या दृष्टीने डब्ल्यूएचओ आणि नवी दिल्ली एम्सनं मिळून एक सीरो प्रिवलेंस सर्व्हे केला आहे. 


Corona Second Wave: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली


एम्सचे कम्युनिटी मेडिसीनचे संशोधन प्रमुख डॉ. पुनीत मिश्रा यांच्या नेतृत्वात हा सर्व्हे दिल्ली, बल्लगढ (फरीदाबाद), गोरखपूर, भुवनेश्वर आणि अगरतळा या पाच ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आला. या ठिकाणी केलेल्या सर्व्हेदरम्यान 4509 लोकांना स्टडीमध्ये सहभागी करण्यात आलं. यातील 2811 सीरो पॉझिटिव्ह आढळून आले. म्हणजेच 62.3 टक्के इतका सीरो पॉझिटीव्हीटी दर असल्याचं या अभ्यासात समोर आलं आहे.


Covid-19 Sero Survey: देशातल्या 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला, राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल 


या सर्व्हेतून समोर आलेल्या महत्वाच्या गोष्टी


- दक्षिण दिल्लीच्या शहरी क्षेत्रात रिसेटलेमेंट कॉलनी जिथं दुसऱ्या लाटेच्या आधीही 74.7%  सीरो प्रभाव होता.  


- दक्षिण दिल्ली मधील 0-18 वयोगटातील (शाळेत जाणारे विद्यार्थी) 73.9% सीरो प्रिवलेंस आढळून आला. 


- दिल्ली आणि एनसीआर विशेषता फरीदाबाद या परिसरात दुसरी लाटेनंतर अधिक सीरो प्रिवलेंस होऊ शकतो. शक्यता अशी आहे की, सीरो प्रिवलेंसचे स्तर 'तिसरी लाटे' विरोधात सुरक्षात्मक असू शकतात.  


- दिल्लीच्या गर्दीच्या परिसरात मुलांमध्ये कोरोनाचा अत्याधिक प्रसार आहे. त्यामुळं शाळा उघडणं धोक्याचं होऊ शकतं.  


- दुसऱ्या लाटेत फरीदाबाद ग्रामीण क्षेत्रामध्ये  59.3%  सीरो प्रिवलेंस आहे.  


-  सर्वेक्षणात सहभागी ग्रामीण भागातील अर्ध्याहून अधिक म्हणजे  62.3% लोकांमध्ये संक्रमणाचे पुरावे मिळाले आहेत.