Ahmedabad Serial Blast : 26 जुलै 2008 ही तारिख अहमदाबादकरांच्या अंगावर शहारा आणते. अवघ्या 70 मिनिटांत 22 बॉम्बस्फोटांनी अहमदाबाद हादरलं होतं. स्फोटांमध्ये तब्बल 56 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 200 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी एकूण 24 बॉम्ब लावले होते. पण त्यातल्या कलोल आणि नरोदामध्ये लावलेले बॉम्ब निकामी झाले. तब्बल 13 वर्ष न्यायालयात खटला सुरु होता अन् आज अखेर त्याचा निकाल लागला. न्यायालयानं 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर उर्वरित 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


26 जुलै 2008: अहमदाबादमध्ये कुठे स्फोट झाले?



  • अहमदाबाद सिविल हॉस्पिटल, ट्रॉमा सेंटर

  • खडिया

  • रायपूर

  • सारंगपूर

  • एलजी अस्‍पताल, मणिनगर

  • मणिनगर

  • हाटकेश्वर सर्कल

  • बापूनगर

  • ठक्कर बापा नगर

  • जवाहर चौक

  • गोविंदवाडी

  • इसानपूर

  • नरोल

  • सरखेज


हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीनं या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. या स्फोटांनंतरही केरळ, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, नवी दिल्लीसह गुजरातमधील इतर शहरांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्या येत राहिल्या. 


पाहा व्हिडीओ : Ahmedabad bomb blast प्रकरणात तब्बल 38 दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली : ABP Majha





  • 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट झाले

  • या बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते

  • या प्रकरणी अहमदाबादमध्ये 20 आणि सुरतमध्ये 15 एफआयआर नोंदवण्यात आले होते

  • डिसेंबर 2009 पासून सुनावणी सुरू झाली. न्यायालयानं सर्व 35 एफआयआर एकमध्ये विलीन केले

  • 1,163 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. 6 हजारांहून अधिक पुरावे सादर करण्यात आले

  • एकूण 78 आरोपी होते. एक सरकारी साक्षीदार बनला. त्यानंतर 77 आरोपींवर खटला चालवण्यात आला

  • 8 फेब्रुवारी 2022 रोजी 49 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. 28 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली

  • विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी 6752 पानांचा निकाल दिला

  • 49 दोषींपैकी 38 जणांना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली


70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट 


अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत तब्बल 49 दोषींना शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 38 जणांना फाशी, तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरण म्हणजे, अवघ्या देशासाठी काळा दिवस. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणे सुरु होतं. बाजारपेठांमध्ये लगबग सुरु होती, मात्र त्यानंतर सायंकाळी 6.45 वाजता मणिनगर येथील गजबजलेल्या बाजारपेठेत अचानक स्फोट झाला. त्यानंतर 70 मिनिटांतच संपूर्ण अहमदाबाद हादरलं. अहमदाबादमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 21 बॉम्बस्फोट झाले होते. 


सरकारी आकडेवारीनुसार, या बॉम्बस्फोटांमध्ये 56 जणांनी आपला जीव गमवावा लागला होता आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. 2002 मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीननं हे स्फोट घडवून आणले होते. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा विधानसभा मतदारसंघ होता. मणिनगरमधून दोन जिवंत बॉम्ब पोलिसांनी जप्त केले होते. तर मणिनगरमध्ये तीन ठिकाणी स्फोट झाले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha