श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) जवानांच्या ताफ्याजवळ आज (शनिवारी) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. बनिहाल येथे श्रीनगर-जम्मू महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. त्यावेळी या ताफ्याजवळच एका कारमध्ये स्फोट झाला. गाडीमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट घडवून आणला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारचा चालक बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे.

14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांचा ताफा प्रवास करत असताना एका दहशतवाद्याने जवानांच्या एका बसवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे 40 जवान शहीद झाले. आज याच हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न झाला. गाडीमध्ये स्फोटकांऐवजी सिलिंडर होता. या सिलिंडरचा स्फोट घडवून आणला.

व्हिडीओ पाहा



या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु सीआरपीएफच्या बसचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत खूप त्रुटी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.