नवी दिल्ली : लॉकडाऊननंतरही देशातल्या सर्व जिल्ह्याच्या सीमा दोन आठवड्यांसाठी सीलचं ठेवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती मिळत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे देशातील महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशांतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला ह्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन नंतरही कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीय. त्यामुळे देश तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याची भीती व्यक्ती करण्यात येत आहे. हा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रत्येक जिल्हा पातळींवर हायड्रोक्सोक्लरोक्वीनच्या दहा हजार गोळ्या आल्याची माहिती देण्यात आलीय.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा 21 दिवसांचा लॉकाडाऊन येत्या 14 एप्रिलला संपणार आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी आज देशातील महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा केली. यात लॉकडाऊननंतर देशातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे सीलच ठेवण्याच विचार असल्याचे कळतंय. या संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणेला ह्या सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान, प्रत्येक जिल्हा पातळींवर हायड्रोक्सोक्लरोक्वीनच्या दहा हजार गोळ्या आल्या असल्याचीही माहिती आहे. या औषधाचा कोरोना रुग्णावर प्रभावी वापर होत असल्याचे सांगितले जात आहे.
coronavirus | पुण्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी, मृतांची संख्या पाचवर
देशात 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्वत्र संचारबंदी घोषित करण्यात आली असून केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं, दुकानं, मेडिकल्स, हॉस्पिटल्स सुरू आहेत. देशात रोज कोरोनाबधितांचा आकडा वाढत चालला आहे. तीन हजारच्या वर कोरोनाबाधित देशात आढळले आहेत तर 77 लोकांना मृत्यू यामुळे झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Aurnagabad Corona Death | मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 59वर्षीय व्यक्तीचा मृत्यू