मुंबई : लोकसभा निवडणूक जसजशा जवळ येत आहेत, तसतसं प्रचाराच्या अनोख्या शक्कल लढवल्या जात आहेत. पतंग, बॅग, साडी यांच्यावर एखाद्या नेत्याचा फोटो असणं ही आता सामान्य बाब झाली आहे. मोदींचं चित्र असलेली साडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गुजरातसह मुंबईच्या बाजारात मोदी साडीचा बोलबाला आहे. मुंबईतील एका साडीच्या दुकानातही मोदी साडी पाहायला मिळत आहे.



महत्त्वाचं म्हणजे मोदी साडीला राहुल गांधी साडी, प्रियांका गांधी साडीही टक्कर देताना दिसत आहे. आशियातील सर्वात मोठ्या कपड्याच्या बाजारात अर्थात सूरतमध्ये आधी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र साड्यांवर छापले जात होते. पण आता या साड्यांवर दोन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमवीर काँग्रेस समर्थक कपडा व्यायसायिकांनी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांझी यांचं चित्र असलेल्या साड्या बनवण्यास सुरुवात केली आहे.


सूरतमध्ये बनणाऱ्या साड्या देशातील विविध राज्यांमध्ये पाठवल्या जातात. त्यामुळे राजकीय पक्ष आता साड्यांच्या माध्यमातून आपापला प्रचार करत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी सूरतच्या या कापड बाजारात सामान्यत: भाजपच्या समर्थनार्थ नरेंद्र मोदींचा फोटो प्रिंट असलेल्या साड्याचा तयार केल्या जात होत्या. मागणीनुसार त्या देशाच्या विविध राज्यांमध्ये पाठवल्या जात होत्या. पण नरेंद्र मोदींचा फोटो असलेल्या साड्या चर्चेत आल्यानंतर काँग्रेसला या रेसमध्ये मागे रहायचं नाही. त्यामुळे काँग्रेस समर्थक राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या फोटोच्या प्रिंट असलेल्या साड्या बनवत आहेत.

VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र असलेली साडी मुंबईच्या बाजारात दाखल | मुंबई | एबीपी माझा