जगनमोहन रेड्डी यांनी 'प्रजा वेदिका' याच इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन इमारत पाडण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. "प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती." त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई केल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे. दरम्यान रेड्डींच्या या निर्णयाला टीडीपीने "राजकीय द्वेषातून केलेली कारवाई" म्हटले आहे.
दरम्यान चंद्राबाबू नायडू यांनी प्रजा वेदिका हा बंगला विरोधी पक्षनेत्याचा बंगला म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी मुख्यमंत्री रेड्डी यांनी फेटाळली.
व्हिडीओ पाहा
आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथोरिटीने 5 कोटी रुपये खर्च करुन हा बंगला बांधला होता. चंद्राबाबू नायडू या बंगल्याचा उपयोग पक्षाच्या बैठकांसाठी करत होते, असा आरोप होत आहे. दरम्यान तोडकाम करताना कामगारांनी चंद्राबाबू नायडू यांचे सामान बाहेर फेकले असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.