Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर कॉप म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे या वर्षी डिसेंबर महिन्यात बिहारमध्ये परततील आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते पुन्हा एकदा बिहारमध्ये पाच वर्षांसाठी कार्यभार सांभाळतील. बिहारमध्ये काही मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांपैकी शिवदीप लांडे हे असे अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या कार्यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  


शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले, 'महाराष्ट्रामधील माझ्या कार्यकाळाचे पाच वर्ष पूर्ण झाले. मी डीआयजी (दहशतवाद विरोधी पथक, एटीएस मुंबई) म्हणून माझा कार्यभार सोपवत आहे. मी आता 'आपल्या बिहार'मध्ये सेवा करण्यासाठी परत येत आहे. ' महाराष्ट्रातील रहिवासी असलेले शिवदीप मुंबईत पोलीस गुन्हे शाखेत डीआयजी म्हणून कार्यरत होते. याआधी बिहारची राजधानी पाटणा येथे सिटी एसपी देखील ते होते. अररिया आणि रोहतास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकही होते.
 


New Covid-19 Variant : नव्या व्हेरियंटचा धोका, बाधित देशातून भारतात येण्याजाण्यावर बंदी? DGCA आज निर्णय घेणार


शिवदीप लांडे यांनी पाटणा येथे सिटी एसपी असताना ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांविरोधात, बनावट नोटा छापणाऱ्यांविरोधात, बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवून तेथे आपली दहशत निर्माण केली होती.एकदा एका व्यावसायिकाच्या हत्या झाल्यानंतर सर्व दुकाने बंद असताना एका गुन्हेगाराला पकडून त्यानी  रस्त्याच्या मधोमध मारले होते. आता पाच वर्षांनंतर दारूबंदी कायद्यावरून सुरू असलेल्या गदारोळात, बिहारमध्ये परतणाऱ्या आयपीएस शिवदीप लांडे हे त्याच्यावर देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Lalu Yadav Admitted in AIIMS: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव एम्स रुग्णालयात दाखल 



'तारीख पे तारीख'मधून सुटका? खटल्यांच्या सुनावणीसाठी कालावधी निश्चित करण्याची वेळ : सर्वोच्च न्यायालय