नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिपदाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिल्लीत हवा तसा शासकीय बंगला मिळाला आहे. 11, सफदरजंग लेन हा दिल्लीतल्या टाईप-8 चा बंगला आठवलेंना देण्यात आला आहे.

मंत्री अनिल दवे यांचं निधन झाल्यानंतर हा बंगला रिकामा झाला होता. 3 एप्रिल 2014 रोजी आठवलेंची एनडीएकडून राज्यसभेवर निवड झाली होती. पण खासदार झाल्यानंतरही त्यांचा शासकीय बंगल्यात प्रवेश झाला नव्हता, कारण ज्येष्ठतेनुसार बंगला मिळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं.

दरम्यान, यूपीएच्या काळात बंगल्यातून सामान बाहेर काढलेल्या रामदास आठवलेंना अखेर 8 वर्षांनी त्यांच्या मनासारखा बंगला दिल्लीत मिळाला आहे. आज आठवलेंनी आपल्य़ा नव्या बंगल्यात प्रवेश केला आहे.